महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिलकीस शेख (लोणंद )
संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असलेला आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत असताना खंडाळा तालुका लोणंद येथील राम मंदिरात दीपोत्सव व महाआरती करून भूमिपूजनाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

तसेच यावेळी जय श्रीराम व परमप्रिय भगवा ध्वज याची रांगोळी काढून लोणंद येथील महिलांनी आनंद व्यक्त केला यावेळी माजी नगरसेविका सौ. स्नेहलता शेळके पाटील सौ दीपिका घोडके सुवर्णा क्षीरसागर सौ. दर्शना रावळ चारुशीला शेंडे वृषाली जोशी हर्षदा शेळके श्री. हर्षवर्धन शेळके पाटील सुनील बनकर आदी राम भक्त उपस्थित होते.






















