दहिवडी : ता.०८
आंधळी ता.माण येथील पवारदरा या ठिकाणी मध्यरात्री पती पत्नी शेतात भिजवण्यासाठी आले असता अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनाचे कारण अद्याप समजले नसून शस्त्र घेऊन अज्ञात आरोपी फरार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संजय रामचंद्र पवार (वय-५०वर्षे) व मनीषा संजय पवार (वय -४५ वर्षे) हे दोघे रात्री दहा नंतर पवारदरा येथील शेतात भिजवण्यासाठी आले होते. शेतात भिजवण्यासाठी पाईप जोडत असताना रात्री अचानक अज्ञाताने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये डोक्यात आणि मानेवर बसलेला जबरी घावामुळे ते जागीच गतप्राण झाले.
सकाळी ०९:३० वाजता पोलिसांना घटनेची माहिती कळल्यानंतर दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पंचनामा केला.




















