छापेमारीचा तीव्र निषेध
बारामती : आयकर विभागाच्या कारवाईनंतर अजित पवारांच्या समर्थनार्थ बारामतीत आयकर विभाग आणि केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. अजित पवार यांच्याविरोधातील आयकर विभागाच्या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. आज बारामतीत देखील त्याचे पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ व आयकर विभाग आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध आज बारामती येथील भिगवण चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखली करण्यात आली. “अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”…. “हमारा नेता कैसा हो अजितदादा जैसा हो”… अजितदादा अजितदादा only अजितदादा .. अशी घोषणा बाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सलग दोन दिवस छापेमारी सुरू होती. काही ठिकाणी अद्यापही छापेमारी चे सत्र सुरूच असल्याचे सूत्रांकडून माहिती समजते. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या ऑफिसवर सलग दोन दिवस छापेमारी केली. पुण्यात अजित पवारांच्या दोन बहिणी राहतात. त्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.
पंचवटी सोसायटीत रजनी इंदूलकर आणि मोदी बागेत नीता पाटील यांच्या घरांवर छापे सत्र सुरू आहे. कोल्हापुरात अजित पवारांची बहिण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर छापा घालण्यात आला. तिथे अजूनही छापेसत्र सुरू आहे. साताऱ्यात जरंडेश्वर सहकारी कारखान्यातही छापेसत्र सुरू आहे. त्याशिवाय अहमदनगरमध्ये अंबालिका साखर कारखाना, बारामतीत सायबर डायनॅमिक्स डेअरी, दौंड साखर कारखाना इथेही छापेसत्र सुरू आहे. याशिवाय काल सकाळी नंदूरबारमध्ये आयन मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केलीय.
त्यानंतर आता अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी बारामती, भिगवन चौक येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच We Support Ajit Dada अशा समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लवकरच दूध का दूध, पानी का पानी
“अजित पवार यांनी काल आपली प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच दूध का दूध, पानी का पानी, करु असे अजित पवार म्हणाले. पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या अधिकारी छापे टाकले. पाहुणे घरी आहेत, ते गेल्यावर माझी भूमिका मांडेन. नियमाने जे असेल ते समोर येईल. घाबरायचं कारण काय? आयटी छाप्यांनंतर, अजित पवार यांनी काल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लवकरच दूध का दूध पानी का पानी आपण करणार आहोत”
































