तालुक्यातील इतर गावांसाठी 10 कोटी 32 लाखाचा निधी मंजूर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष प्रयत्न
प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून फलटण तालुक्यामधील मुरूम,तडवळे,काळज व विविध रस्त्यांसाठी सुमारे 10 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे . माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत यामध्ये खुंटे , येळकेवस्ती ते पाटणेवाडी या पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी तीन कोटी 45 लाख रुपयांचा निधी यासोबतच विडणी ते वडले या सहा किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे 4 कोटी 14 लाख रुपयांचा निधी व मुरूम , तडवळे ते काळज या सुमारे साडेचार किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी 73 लाख रुपयांचा निधी असा एकूण सुमारे दहा कोटी 32 लाख रुपयांचा निधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून करण्यात आलेला आहे