सातारा – बहुजन मुक्ती पार्टी सातारा जिल्हा कॅलेंडर २०२४ चे प्रकाशन बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिलकुमार माने यांच्या हस्ते महाबळेश्वर या ठिकाणी संपन्न झाले. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी गेले दोन वर्षात चांगले कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत व पार्टीची विचारधारा गावोगावी पोहचवत आहेत. तरुण मुले खासकरून पार्टीच्या विचारधारेला मानून प्रवेश करत आहेत. महिला कार्यकर्ते तसेच वयस्कर लोकांची साथ चांगल्या प्रकारे मिळत आहे. आज प्रकाशन वेळी महाबळेश्वर तालुक्यातील अमित कांबळे, सुनील कांबळे, सुनील कंडारी, सविता कांबळे, उमा परमार, प्रमोद काळे, महेश आवडे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व या सर्वांना डॉ.माने यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना चांगले मार्गदर्शन केले.