महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले ( कळंब – इंदापूर)
समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा अंतर्गत रेडणी ( तालुका इंदापूर ) येथे ग्रामीण कृषी जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रोगांची ओळख आणि रोग नियंत्रण या विषयांवर प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी गणेश हरिचंद्र काळे यांनी येथील शेतकरी यांच्या शेतात जाऊन रोगांची ओळख आणि प्रमुख रोग नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन केले .
सदर मार्गदर्शन करत असताना डाळिंब पिकावरील तेल्या या रोगांची प्राथमिक द्वितीय लक्षणे समजून सांगण्यात आली, सोबतच त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले . त्यासाठी प्रथम उपचार म्हणजे प्रीवेंन्टीव मेजर फवारणी करीत असताना कँफटँफ; कॅप्टन 50 percent (500 ग्रँम),आणि फाँसकाँन (500ग्रँम )यांचे योग्य मिश्रण करून प्रती 200 लिटर पाण्यात वापरावे. जर रोगाचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात असेल तर ब्लू काँपर (500 ग्रॅम) आणि स्ट्रेप्टोसायकलीन ( 500ग्रँम)यांचे योग्य मिश्रण करून प्रती 200 लिटर पाण्यात वापरून फवारणी करावी.
सदर प्रात्यक्षिकाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाची समन्वयक प्राध्यापक मोहिजीतसिंग राजपूत, प्राचार्य नितीन म्हेत्रे , प्राध्यापक शुभम काकड सर ,प्राध्यापक पुरूषोत्तम चेके सर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीदूत गणेश हरिचंद्र काळे आणि शेतकरी सचिन तरंगे सर, रणजित तरंगे आणि महादेव तरंगे,उपस्थित होते.