दहिवडी : ता.२०
दहिवडी कॉलेजच्या १८ ते २४जानेवारी दरम्यान होत असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्राचार्य,टी.एस.माने , प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे, उपप्राचार्य डॉ.अनिल दडस,उपप्राचार्य डॉ. संजय खेत्रे, कार्यक्रमाधिकारी प्रा.कोंडीबा शिंदे, प्रा.हनुमंत कायंदे, प्रा.मारुती ढाणे, प्रा.किरण पवार, किरकसाल गावच्या विद्यमान सरपंच संगीता काटकर, सुनील काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य माने म्हणाले की,स्पर्धा स्वतःशी असेल यश मिळेल.अभ्यासाचा स्तर उंचावत स्पर्धेच्या युगात टिकावे. अभ्यासाशिवाय कोणत्याही यशाला गत्यंतर नाही. महाविद्यालयीन जीवनात शिकत असताना आपण शिक्षणातून आदर्श निर्माण करून स्वतःला घडवल पाहिजे. आपण किमान चांगलं नागरिक बनायला हवे. त्याचबरोबर मोबाईलचा अतिरेक टाळावा. श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे,असे सल्ले दिले. यासाठीच विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर अशी शिबीरे आयोजित केली जात असल्याचे सांगितले.
प्राचार्य, डॉ.सुरेश साळुंखे यांनी शिबिराच्या काळात या गावासाठी आपण सर्वानी भरीव योगदान देत सर्वांच्या लक्षात राहील असे काम करायला पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर आपल्या मार्गदर्शनादरम्यान त्यांनी सर्वांकडून शिस्तबद्द कामाची अपेक्षा केली.
प्रास्ताविक कार्यकामाधिकारी प्रा.कोंडीबा शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अर्चना पोरे यांनी केले, तर आभार प्रा.हनुमंत कायंदे यांनी मानले.