हिंदू धर्माचा, पुरोहित समाजाचा अवमान करणाऱ्यावर कारवाईसाठी तहसीलदारांना लेखी निवेदन
वाई तालुक्यातील ब्राम्हण संघटनेच्या वतीने सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी हिंदू धर्माचा अवमान, व हिंदू धर्मातील पावित्र्य मानल्या गेलेल्या विवाह संस्कारावर, जाणीवपूर्वक ब्राम्हण समाजावर अत्यंत मानहानीकारक व दुर्दैवी वक्तव्य करून चेष्ठा करून जातीय तेढ व जातीय व्देष निर्माण करण्याचा प्रयन्त केल्याने व त्यांच्या या असभ्य वर्तनाचे समर्थन करणाऱ्या जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यावर सुध्दा त्वरित कायदेशीर कारवाई करावी, समस्थ ब्राम्हण समाज या निंदनीय प्रकाराचा जाहीर निषेध करीत आहे, अशी लेखी मागणी वाई तालुका ब्राम्हण संघटनेच्या वतीने तहसीलदार रणजीत भोसले, व पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहेकी, राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कायदा सुव्यवस्था बिघडविणा-या अमोल मिटकरी यांनी जाणीवपूर्वक सांगली येथील राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात अतिशय क्षुद्र भाषेत लग्नातील कन्यादान या पावित्र्य विधीची चेष्ठा केली आहे, सबंध स्त्रीजातीचा अपमान केला आहे, सामाजिक दृष्ट्या जबाबदार असणाऱ्या जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी हसून दाद दिली यामुळे संबंधित ब्राम्हण समाजाच्या अपमान झाला असून भावना दुखावल्या गेल्या आहेत, मिटकरी यांनी यापूर्वी ही अशी जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करून दोन समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयन्त केला आहे, खोटा इतिहास पसरविण्याचे काम केले आहे, तरी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून तमाम हिंदू धर्माचा आदर कारावा, व न्याय मिळवून द्यावा अन्यथा वाई तालुक्यातील ब्राम्हण संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल व तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे, निवेदनावर प्रवीण केळकर, प्रशांत नागपूरकर, यशवंत लेले, सुहास पानसे, अमित सोहनी, केदार गोखले, प्रसाद शेवडे, सौ.वर्षा शेवडे, मिलिंद भंडारी, धनंजय घोडके, वीरेंद्र देव, राहुल सातपुते, विवेक वझे, गजानन सोहनी, मकरंद बनारसवाले, कौशिक कान्हेरे, अभिजित नातू, मिथिल भंडारे, विशाल मित्रगोत्री, मकरंद एरंडे, गौरव देशपांडे, यांच्यासह शेकडो ब्राम्हण संघटनेच्या पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.