दहिवडी, ता : २२
माढा मतदार संघातील माता-भगिनींसाठी अभय दादा जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेला क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रम प्रसंगी करमाळा जिल्हा सोलापूर येथील कार्यक्रमात ५हजार महिलांनी हात उंचावून अभयदादा जगताप यांनाच माढयाचा खासदार करणार असा शब्द दिला.
या कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील पाच हजार पेक्षा जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेस एक पैठणी साडी भेट दिली.
होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी प्रथम बक्षीस होंडा एक्टिवा, द्वितीय बक्षीस फ्रीज, तृतीय बक्षीस एलईडी स्क्रीन, चतुर्थ बक्षीस मिक्सर अशी भव्य बक्षीस असणारा हा कार्यक्रम करमाळा या ठिकाणी पार पडत असताना. रात्री दहा वाजल्यानंतर पोलिसांनी हा कार्यक्रम बंद पाडला. त्यामुळे ५हजार महिलांच्या आशेवर पाणी पडले. मात्र अभय दादा जगताप यांनी सर्व माता-भगिनींना शब्द दिला की हा कार्यक्रम उद्या याच ठिकाणी होईल आणि १४ जानेवारीला ६ वाजता कार्यक्रम सुरु झाला.
हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने कुरघोडी करत पोलिसांना आदेश देऊन दहा वाजता हा कार्यक्रम बंद पडला असा महिला वर्गातून आरोप होत होता. कारण या अगोदर करमाळ्यामध्ये रात्री बारा आणि एक वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहायचे. मात्र अभय जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे व शरद पवारांचे विश्वासू असल्यामुळे त्यांना पाठीमागे खेचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कुरघोडी करत पोलिसांच्या मध्यस्थीने हा कार्यक्रम दहा वाजता बंद पाडून महिलांच्या आशेवर पाणी पाडणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्ही धडा शिकवू व अभयदादा जगताप यांना माढ्याचा खासदार बनवू असा विडा पाच हजार महिलांनी उचलला. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने सर्व स्तरातील लोकांवर अन्याय केला आहे. मात्र महिलांच्या आनंदावर विरजण ठेवणाऱ्या नेत्यांना आणि पक्षांना येत्या लोकसभेत त्यांची जागा दाखवून देऊ. अशी महिला वर्गामध्ये कुजबुज होती.
या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना संबोधित करताना अभयदादा जगताप म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हे महिलांच्या हिताचे सरकार नाही. या सरकारच्या काळामध्ये अनेक महिलांवर अन्याय अत्याचार झाले. अनेक महिलांनी आपले जीवन संपवून घेतले. मात्र या निर्दय सरकारला महिलांची दया आली नाही. बिलकीश बानो यांच्यावरती १४ नराधमांनी बलात्कार केला. मात्र गुजरात सरकारने हा गुन्हा दखल करून घेण्यास नकार दिला. मात्र महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि या प्रकरणातील १४ नराधनांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. माता-भगिनींनो अशा निर्दयी सरकारला पुन्हा मतदान केले तर काही दिवसांनी महिलांना रस्त्यावर फिरणे सुद्धा धोकादायक बनेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केले तर या देशाची लोकशाही तर धोक्यात येईलच. आणि आपल्या गरीबी मध्ये देखील वाढ होईल.
महाराष्ट्राचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा वासाने वारसा घेऊन मी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार करतोय तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार का? असे उद्गार काढल्यानंतर, पाच हजार महिलांनी हात उंचावून शब्द दिला की दादा यावेळेस माढा मतदार संघाचे खासदार तुम्हीच.
पुढे अभय जगताप म्हणाले की, जर तुम्ही माढा मतदारसंघातून मला खासदार बनविले तर माता-भगिनींच्या केसालाही धक्का लागणार नाही. माता-भगिनीवर अन्याय करणाऱ्याला धडा शिकवू. या मतदारसंघातील महिला बचत गट, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या योजना अमलात आणू. माढा मतदारसंघातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी हा भाव तुमच्या पाठीशी कायम उभा असेल. असा विश्वास अभय जगताप यांनी माता-भगिनींना दिला.
यावेळी राष्ट्रवादी करमाळा तालुकाध्यक्ष वारे,युवा नेते किरण खळवे, आयोजक ऋषिकेश जगताप,बंडू नरळे,सुभाष जगताप,दिलीप खरात, रामा शिंदे, भागवत पिसे, शहाजी ढेरे आणि माढा मतदार संघातील आदी मान्यवर उपस्थित होते.