शिवथर येथे बुधवारी मध्यरात्री दोन ठिकाणी चोरी झाली असून 28 ते 30 हजार रुपये चोरट्याने घेऊन पोबारा केला.
शिवथर येथील किरण किसनराव साबळे पाटील यांचे क्रेशर वरील ऑफिस बुधवार दिनांक 7 रोजी मध्यरात्री फोडून कागदपत्रांची नासधूस करून कपाटातील 28 ते 30 हजार रुपये चोरट्याने चोरी करून पळून गेले . तसेच बिपीन शंकर साबळे यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा लोखंडी रॉड ने काढून घरामध्ये प्रवेश केला परंतु घर मालकाच्या लक्षात आल्यानंतर मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पळून गेले सहा तरुण युवक सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तीन महिन्यापूर्वी शिवथर येथेच दिवसाढवळ्या रस्त्यावरच घर फोडून चोरी झाली होती तसेच संबंधित मालकावर कोयत्याने वार करून चोरट्याने पोबारा केला होता. याची नोंद सातारा तालुका पोलीस स्टेशनला झालेली होती.
सातारा तालुका पोलीस स्टेशनला संबंधित चोरी झाल्याचे कळविले असता शिवथर बिट अंमलदार गोरे पोलिस हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलेला आहे.