खंडाळा तालुक्यातील या कार्यक्रमाला खा. उदयनराजेंची उपस्थिती, युवावर्गाशी साधला संवाद
दहिवडी : ता.१४
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील खंडाळा तालुक्यातील अतीत गावामधे भाजपा जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा चिन्मय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व खंडाळा युवा मोर्चा मंडलाध्यक्ष हृषिकेश धायगुडे यांच्या नेतृत्वात कॉफी विथ यूथ हा कार्यक्रम खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तरुणांनी छ.खा.उदयनराजे भोसले यांच्याबरोबर मनसोक्तपणे संवाद साधला.युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना खा.छ.उदयनराजे भोसले यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरे दिली.
या कार्यक्रमाला भाजपा लोकसभा संयोजक सुनील काटकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले चव्हाण,भाजपा मंडलाध्यक्ष अनिरुद्ध गाडवे, अनूप सूर्यवंशी, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके,शैलेश सपकाळ,उपाध्यक्ष तेजस कदम, तेजस जाधव ,मयुर कुडापणे ,संग्राम ढमाळ,अनिल ढमाळ ,ऋषिकेश यादव ,करण गाढवे ,सुरज शिरावळे ,प्रदिन ढमाळ,कुणाल गाढवे ,वैभव जाधव ,विज्ञान जाधव ,रोहित चव्हाण,प्रथमेश घाड़गे,सचिन जाधव,अभिजित शिंदे व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















