महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :म्हसवड
माण तालुक्यातील वरकुटे – मलवडी येथील एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने वरकुटे – मलवडी मधील बाधित रुग्ण सापडलेल्या परिसरपासून एक किलोमीटरचा परिसर सुक्ष्म प्रति बांधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. दरम्यान पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण गांवात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
वरकुटे – मलवडी येथील ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे वरकुटे – मलवडी करांची धास्ती वाढली आहे. ही माहिती मिळताच रहिवासी भाग कन्टेन्मेट झोन जाहीर करण्यात आला आहे. संबंधित तरुण वरकुटे – मलवडी येथे शेतकरी म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मूतखडाच्या त्रास होता . गेली काही दिवस या आजारावर म्हसवड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करित होता. मूतखड्याचा अधिक त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी फलटण येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेले होते. त्याच्यावर तिथे शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. शस्त्रक्रिया पूर्वी कोरोनासाठी बुधवार दि. १५ स्वँब घेण्यात आला होता . गूरुवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. वरकुटे – मलवडी येथील तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती समजतात गावात एकच खळबळ उडाली आहे.
हि माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी गावात भेट देवून आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना करित गावातील लोकांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बाधिताच्या घरातील व शेजारील अतिनिकट सहवासातील १४ लोकांना तात्पुरत्या स्वरूपात म्हसवड येथे क्वार्टटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान सरपंच बाळासाहेब जगताप , उपरपंच कबीर इनामदार , ग्रामविकास अधिकारी आय ए शेख , म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश वाघमोडे , कामगार तलाठी म्हेत्रे , पोलीस पाटील धनंजय सोनवणे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
कोरोना बाधित तरुण हा मुंबई , पुणे अथवा बाहेरून आलेला नसून तो स्थानिक रहिवासी असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेले वरकुटे – मलवडी व परिसरात स्मशान शांतता पसरली आहे . ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये. तसेच मास्कचा वापर करा .असे आवाहन ग्रामदक्षता कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे