पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरून वीज बचतीचे केले नियोजन
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणार्या तापोळा विभागातील वानवली पाली ग्रुप ग्रामपंचायती ने वीज वितरण कंपनीचे वीज कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला असून, संपूर्ण दोन्ही गावांमध्ये सोलर लाईट स्ट्रीट लाईट वापरण्याचे ठरवले व उत्कृष्ट कंपनीचे सोलर लाईट खरेदी करून सोलर विद्युत पुरवठा सुरू केला आहे.
यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायती वर आर्थिक भार कमी होवून गावच्या विकासासाठी हातभार लागणार आहे. सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य यानिमित्ताने होणार असून अंमलबजावणीसाठी लागणारा निधी ग्रामपंचायत अन्य कार्यांसाठी वळता करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यात सरपंच गणेश उत्तेकर सर्व सदस्य व खराडे ग्रामसेवक यांना ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.






















