दहिवडी : ता.२६
माण तालुक्यातील मार्डी येथील सुभाष सर्जेराव पोळ व कमल सुभाष पोळ या दांपत्यास दहिवडी न्यायालयाने चांगला दणका दिला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम २४८(२) द्वारे भारतीय दंड संहिता १८६० च्या ३४सह कलम ३२४ आणि ३२३ नुसार दंडनीय गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे.
जमिनीच्या वादात निकाल देताना दहिवडी न्यायालयाने पोळ दाम्पत्याला चांगलेच धारेवर धरले. शिक्षा सुनावताना न्यायालयाने त्यांनी भविष्यात असा गुन्हा पुन्हा करणार नाही, ते भविष्यात चांगले मानव बनतील, बॉण्ड पुढे एक वर्षानंतर रद्द होईल अशा अटी घातल्या. दोघांनाही एकत्रितपणे दहा हजार रुपये (प्रत्येकी ५ हजार), प्रोबेशन ऑफेंडर कायदा १९५८ च्या ०५ नुसार माहिती देणाऱ्यास भरपाई देण्याचे आदेश संबंधितांना न्यायालयाने दिले आहेत.