महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : देशमुखनगर (नागठाणे )
पाडळी(ता. सातारा) येथे चोरून सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून चार जणाना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून ३६,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या बाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पाडळी येथील मातंगवस्ती मधील लक्ष्मीआई मंदिरा समोर काही जण पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली.यावेळी बोरगाव पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता काही इसम मोकळ्या शेडमध्ये पेपर टाकून दोन दोन जणांचे ग्रुप करून जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी यावेळी नितीन कृष्णराव देशमुख (वय.३०),कुलदीप बाळासाहेब ढाणे(वय.३८),उद्धव साहेबराव खवळे(वय.३७),रोहित दिनकर वरक(वय.२०,सर्व रा.पाडळी, ता.सातारा) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडून रोख ५६००रुपये,३ मोबाइल हँडसेट,पत्याची पाने असा एकूण ३६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत त्यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख , मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ. सागर वाघ,हवालदार मनोहर सुर्वे,किरण निकम,विजय साळुंखे,विशाल जाधव यांनी केली.