बारामती ता.०४-: माणूस म्हणून आपण आपले काम निष्ठापूर्वक केल्यास दिसणारे बदल हे ग्रामविकासातील खूप मोठे यश असेल .असे मत सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले.
सुनील निंबाळकर बारामती प्रतिनिधी
यशदा पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानअंतर्गत लिंगसमभाव व बालस्नेही पंचायत या विषयाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
ग्रामीण भागातील मानवाला काय अडचणी आहेत त्याला कोणत्या गरजा आवश्यक आहेत हे ओळखून काम करणे गरजेचे आहे.यासाठी लोकप्रतिनिधी,स्थानिक संस्था आणि शासकीय अधिकारी यांचा समन्वय असेल तर अधिक गतीने मानव विकास साधता येईल.आज जे प्रशिक्षण आपण यशदाच्या वतीने आयोजित केले आहे.यामुळे ग्रामीण भागाची शाश्वत विकासाकडे वाटचाल होईल अशी अपेक्षा आहे.यावेळी यशदा उपसंचालक डॉ.रामप्रसाद पोले, संस्था कार्यक्रम समन्वयक सचिन खलाटे उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित 3 दिवशीय निवाशी प्रशिक्षणासाठी पुणे व कोकण विभागातील 34 राज्यस्तरीय शासकीय प्रशिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाला श्री.प्रमोद पवार संचालक यशदा,श्रीमती अश्विनी कांबळे जिल्हा महिला बालविकास अधिकारी पुणे,ऍड विजय देशमुख, डॉ.स्मिता कुलकर्णी, डॉ.जयमाला दिघडे,प्रमोद कालेकर,यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.आर. दीघडे,आदिती वालवडकर,असीम शेख यांनी योगदान दिले.