महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. १२ जानेवारी : सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यामुळे सातारा जिल्ह्याची आणि जिल्हा परिषदेची संपूर्ण महाराष्ट्रात नाहक बदनामी झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या दि. १३ रोजी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेमध्ये सदरील भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्याच्या बदलीचा ठराव संमत करण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली आहे.
संबंधित भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्या चा सातारा जिल्हा परिषदेमधील तीन वर्षांचा कार्यकाल संपलेला असून या भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यामुळे सातारा जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी झालेली आहे. या बदनामीमुळे जिल्ह्याची मान खाली गेली आहे. अशा या भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्याची ताबडतोब बदली करून सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला न्याय देण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
































