माजी नगरसेवकासह;संशियित आरोपी फरार
फलटण : फलटण शहरातील गुन्हेगारी प्रमाण एवढे वाढलेली आहे की फलटण शहरातील जुनी असलेली पोलीस चौकी च्या समोर खुनी हल्ल्यामध्ये एकाचा निघृण खून करण्यात आला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. फलटण शहरात दिवसाढवळ्या झालेल्या खुनी हल्ल्यामुळे फलटणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका निवडणुकीच्या तोंडावर ती ही घटना घडल्यामुळे फलटणमध्ये पुन्हा एकदा संघटित गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. अशी भीती फलटणच्या लोकांमध्ये पसरलेली आहे.
याबाबत वृत्त असे की बुधवार दिनांक 12 रोजी फलटण शहरात असलेल्या राम मंदिरा समोरील जुन्या पोलीस चौकी समोर फलटण पालिकेचे माजी नगरसेवक तथा या खून प्रकरणातील आरोपी सलीम शेख व त्यांचा मुलगा सैफुल्ला सलीम शेख ,जमीर सलीम शेख, बिलाल ( पूर्ण नाव माहित नाही) राज बागवान व इतर अनोळखी यांनी विलास (मछली) भोई व भारत लक्ष्मण फडतरे हे राम मंदिरा समोरील जुन्या पोलीस चौकी समोर उभे असताना जुन्या वादातून खुन्नस काढून तीक्ष्ण व धारदार हत्याराने तलवारीने व गजाने बेदम मारहाण केली. ही मारहाण एवढी क्रुर होती की घटनास्थळी असलेल्या नागरिकांनाही मारहाण बगवत नव्हती. भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे फलटण शहरामध्ये दहशतीचे वातावरण झालेले असून पूर्ण शहरामध्ये खळबळ उडाली. त्यामध्ये जखमी झालेल्यांना फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेहेताच यावेळी विलास उर्फ मछली भोई याला मयत घोषित करण्यात आले तर गंभीर जखमी झालेल्या फडतरे याला अधिक उपचारासाठी बारामती येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे
फलटण शहरामध्ये दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे. याची फलटण शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा १२.३० च्या दरम्यान गुन्हा नोंद झालेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास फलटण पोलीस निरीक्षक केंद्रे करत आहेत.