महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / खटाव :
खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 29 वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधित आला. मात्र या युवकाची कोणत्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री नसून तो बोंबाळे येथे गावातच राहत होता. सदर युवकाला मागील 10 दिवसापासून तापाची लक्षणे होती, मात्र ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्या कारणाने व आजारी असल्याचे गांभीर्याने न घेता तो कातरखटाव, गोपुज व खातवळ येथे गेला होता. सदर युवकाला 2 दिवसांपूर्वी तापाचा त्रास वाढल्याने त्याला सातारा येथे दाखल करून त्याचा स्वबचे सॅम्पल घेण्यात आले व टेस्टसाठी पाठवण्यात आले. रविवारी सदर युवकाचा कोरोना अहवाल बाधित आल्याने बोंबळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेले 16 जणांना मायणी मेडिकल कॉलेजमध्ये विलगिकरण कक्षात दाखल केले आहे. खटाव तालुक्यात पहिला स्थानिक रुग्ण आढळला असून बोंबाळेसह कातरखटाव, गोपुज व खातवळ या तीन गावातील लोकांनी ज्यास्त काळजी घेण्याची गरज आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक पाटील व बोंबाळे गावचे पोलीस पाटील हजारे यांनी दिली आहे.