नवारस्ता प्रतिनिधी : ग्रामीण युवकांनी अर्थाजनाच्या शोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.विलास सुर्वे यांनी श्रीमती विजयादेवी देसाई काँलेज व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांचे संयुक्त विदयमाने ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते.
महाविदयालयीन जीवनात मातृभाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मातृभाषेतील कौशल्ये आत्मसात करून रोजगाराच्या संधीचा शोध घेणे आवश्यक आहे. मातृभाषा शिक्षणातून प्राध्यापक, लेखक- कवी, अनुवादक, भाषांतरकार, स्पर्धा परीक्षा, मिडीया क्षेत्रातील वार्ताहार, संपादक, मुद्रितशोधन, द्विभाषीक क्षेत्रातील रोजगाराच्या संधीची उपलब्धता श्री. सुर्वे सर यांनी सांगितली. युवकांनी आपणातील योग्य गुणांची जोपसना करून अनावश्यक गोष्टींचा त्याग केला पाहिजे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्र.प्राचार्य श्री.कांबळेसर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमोल पाटील यांनी केले तर आभार प्रा.सौ.एस.ए.शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.जे.आर गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.