सातारा : सातारा येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या श्रीमती एन.एम. जमादार, मुख्य न्यायाधीश ,बाळ न्याय मंडळ या म्हणाल्या, सध्याच्या डिजिटल जगातील जगातील युवक विविध डिजिटल माध्यमांचा सढळ वापर करत आहेत. कालानुरूप हि साधने आपण वापरली पाहिजेत परंतु हि डिजिटल साधने युवकांच्या सहनशीलेवर परिणाम करत आहेत .
युवकांची सहनशीलता कमी होत असून याचा परिणाम समाजव्यवस्थेवर होत आहे. युवकांनी या गोष्टीपासून सजग आणि सावधान असलेच पाहिजे .
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मागर्दर्शनानुसार महाविद्यालयाच्या प्राचार्या व रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सौ . प्रतिभा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
श्रीमती जमादार म्हणाल्या, जीवनप्रवास सक्षमपणे करण्यासाठी विवेकानंदांचे विचार व राजमाता जिजाऊंची शिकवण आचरणात आणली पाहिजे . विवेकानंदांच्या नजरेतील तरुण बनून स्वतःला आदर्श बनवा .
यावेळी अॅड . संतोष भोसले यांनी मार्गदर्शनात सांगितले, युवकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे . कोणत्याही कारणानेवैफल्यग्रस्त न होता ध्येय प्रेरित होऊन जीवनाला सामोरे गेले पाहिजे . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य अरुण बावळेकर यांनी केले. लघुलेखक दिलीप भोसले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. आसावरी शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विध्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते