तर राजभवनावरील पदाधिकार्यांच्या बैठकीत संजय भोकरे यांना सकारात्मक प्रतिसाद.
मुंबई विशेष प्रतिनिधी
संपूर्ण जगावर व देशावर कोरोना या साथ रोगाचे थैमान माजले असून राज्याला या संकटातून मुक्त करण्यासाठी महा विकास आघाडीचे सरकार नक्कीच प्रयत्न करत आहे . या काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी राजकीय निर्णयासह प्रशासनाला प्रसिद्धीच्या माध्यमातून जे सहकार्य केले ते सहकार्य महाविकास आघाडीच्या सरकारला योग्य दिशेने नेणारे ठरले त्यामुळे राज्यातील पत्रकारांवर जे संकट ओढवले आहे त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी काल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय फुलसुंदर आदी या शिष्टमंडळात होते .यावेळी शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना राज्यातील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून यामध्ये सरकारला मोठी कसरत करावी लागणार असून ग्रामीण भागातील पत्रकारांना देखील व शहरी भागातील पत्रकारांना या काळामध्ये अनेक वर्तमानपत्रांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक अनेक पत्रकारांना व विविध पदावर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना कामावरून कमी केल्यामुळे जे त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवले ते संकट नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करण्यास भाग पाडत आहे .महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे पत्रकार काम करतात ते अत्यंत गरीबीत हलाखीत पञकारितेचे काम करत असून त्या पत्रकारांना खरी मदतीची गरज आहे .संजय भोकरे या माणसाने शैक्षणिक, पत्रकारिता या क्षेत्रात कार्य केले ते कार्य माझ्यासारख्या माणसाला नक्कीच भूषणावह ठरणारे असल्याचे खुद्द शरद चंद्रजी पवार यांनी व्यक्त केले. महा विकास आघाडीचे सरकार असले तरी पत्रकारांसाठी जे काही करता येईल त्यासाठी मी या सरकारला नक्कीच करण्यास भाग पाडेल पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून या स्तंभाला आधार देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार नक्कीच करेन तर विधान परिषदेवर पत्रकारांमध्ये एक प्रतिनिधी घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने केली असता याबाबत त्यांनी महा विकास आघाडीची बैठक होईल त्यामध्ये या विषयाला प्राधान्यक्रम दिला जाईल पत्रकारांचा देखील एक प्रतिनिधी असावा ही माझी देखील इच्छा असून राज्यभरात या पत्रकार संघाने चांगले काम केले व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पत्रकारांचा एक नेता विधानपरिषदेवर असावा असेदेखील माझे मत असले तरी पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांना संधी देणे हेदेखील माझे परम कर्तव्य असून राज्यपाल कोट्यातून पत्रकारांना देखील नक्कीच प्रतिनिधित्व द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले .40 मिनिटे त्यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा करत असताना जुन्या पत्रकार बद्दल देखील त्यांनी आस्थेने विचारपूस केली .महाराष्ट्रात कोणत्याही भागात गेलो तरी त्या भागातील पत्रकारांची अजूनही माझी ओळख आहे जुन्या पत्रकारांनी जी पत्रकारिता केली ही पत्रकारिता तरुण पत्रकार यांनी देखील अवगत करून पत्रकारिता समाजासाठी आपल्या पत्रकारितेतून समाजाचे प्रश्न सोडवावेत असा सल्ला देखील त्यांनी दिला. पत्रकारांनी देखील संकटाला सामोरे जात असताना शासनाचे आपण एक एक कर्तव्यदक्ष प्रतिनिधी आहोत शासन देखील आपल्या कार्याची दखल नक्कीच घेईन असे लिखाण त्यांनी करावे ज्या भागात अन्याय होत असतील तर त्या भागातील प्रश्न शासन दरबारी मांडावे याची प्रमुख भूमिका त्यांनी ठेवावी पत्रकारिता हा समाजसेवेचा एक भाग असून सरकार चालवत असताना या सरकारला चाप बसवण्याचे काम पत्रकारच करू शकतो असेदेखील त्यांनी स्पष्ट केले तर ग्रामीण भागातील पत्रकारां विषयी माझ्या मनात आजही वेगळे स्थान असून माझ्या ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न माझा ग्रामीण भागातील पत्रकाराच सोडवू शकतो. हे काम सांगली मिरज येथील संजय भोकरे या तरुणाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना करून संपूर्ण राज्यभरात पत्रकारांचे एक व्यासपीठ निर्माण केले त्यामुळे यांचा मला अभिमान आहे पत्रकारांच्या सुख दुःखासाठी अनेक वर्षांपासून संजय भोकरे काम करत असल्याचे माझे कार्यकर्ते मला सांगतात त्यावेळी माझे मन देखील भरून येते. पत्रकारांनी देखील चांगले चांगले विषय हाती घेऊन प्रथम आपले गाव तालुका जिल्हा व राज्य यासाठी आपल्या लेखनातून वेगळेपण दाखवून द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच यावेळी राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांचे राजभवन येथील सचिव उल्हास मुणगेकर , व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पत्रकारांच्या विषयी कोरोणा काळात जी बिकट अर्थव्यवस्था निर्माण झाली त्या वेळी राज्य मराठी पत्रकार संघाने आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून गोरगरीब समाजासाठी मोफत किराना व अन्नधान्य तसेच शासकीय अधिकारी, पोलीस महसूल, आशा स्वयंसेविका यांना मदतीचा हात दिला तर तीन महिन्याच्या काळामध्ये प्रिंटींग व्यवस्था बंद होती तर अनेक वृत्तसमूहाने कोणतीही कल्पना न देता कर्मचारी वर्गाला व पत्रकारांना कामावरून कमी केले अनेक दैनिकांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या आवृत्या बंद करून अनेक पत्रकारांवर व संपादक ,वृत्तसंपादक वितरण व्यवस्था जाहिरात व्यवस्था ऑपरेटर ,मशीन कर्मचारी यांच्यावर रोजगार गमावण्याची वेळ आली त्यामुळे विधान परिषदेवर आमच्या हक्काचा माणूस पाहिजे यासाठी महामहिम राज्यपाल महोदय यांनी पञकारांचा एका प्रतिनिधीस विधान परिषदेवर संधी द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांना संधी द्यावी एकमुखी मागणी करण्यात आली. लवकरच याबाबत राज्यपाल महोदया बरोबर राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.