महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (पिंपोडे बुद्रुक)
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वाठार किरोली येथील काकासाहेब गायकवाड व उपसभापतीपदी पिंपोडे बुद्रुक येथील जयेंद्र लेंभे यांची बिनविरोध निवड झाली.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी काकासाहेब गायकवाड आणि उपसभापती पदासाठी जयेंद्र लेंभे यांचे अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
या निवडी प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, मुंबई बाजार समिती संचालक बाळासाहेब सोळस्कर,जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ,माजी जिल्हा परिषद सदस्य विकास साळुंखे,माजी सभापती बाळासाहेब भोईटे, माजी संचालक जिल्हा बँक तानाजीराव मदने, अजय कदम, माजी पंचायतसमिती सदस्य अशोकआबा लेंभे,माजी उपसभापती गुलाबराव जगताप,माजी संचालक चंद्रकांत निकम, शांताराम दोरके, संभाजीराजे निकम, राजेंद्र घाडगे, आनंदराव निकम, अर्जुन साळुंखे, संदीप धुमाळ, संजय साळुंखे,संचालक आदी उपस्थित होते.