महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी : गणेश पवार
राज्यातील सर्व खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या लोकांवर निबंधक (Msvc) यांचेकडुन विनाकारण नाहक बदनामी व त्रास देत आहेत तसेच संविधानाने भारतीय पशुवैद्यक कायदा १ ९ ८४ च्या कलम ३० ( ख ) व कलम ५७ ( १ ) बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन व वर्तमानपत्रात चुकीची माहिती प्रसारीत करुन आमची बदनामी करण्यात येत आहे . यासाठी आमच्या संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या वतीने वेळोवेळी संबधीत अधिकारी यांना पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल किवा खुलासा केला जात नाही . तरी फलटण तालुक्यातील सर्व खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे सर्व डॉक्टर्स दिनांक २२ पासुन मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद अदोलन करणार आहोत . संप पुकारल्यानंतर होणा – या पशुधनाच्या नुकसानीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील . खाजगी व निमशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे शहर व तालुक्यात जवळपास २५० डॉक्टर्स आहेत . पशुवैद्यकीय , पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ शाखा फलटण(नारायण जोशींसौ)यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्ष गौधन,पशुउपचार व पैदास यावर काम करीत असून तालुक्यातील इतर संघटनांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष डॉ . आनंदा जाधव , उपाध्यक्ष डॉ . विजय साळुंखे ,खजिनदार डॉ संतोष जाधव, सचिव डॉ.रविंद्र रणवरे,सेक्रेटरी दीपक माने,संघटक ,सुरेश करे, गरुड, गरुड, महेंद्र साळुंखे,दिनेश रणवरे,गणेश रणवरे,शिवाजी तांबोळी,निलेश नलवडे,शशिकांत भोसले,महेंद्र भोसले,शरद पवार,कारंडे,रुपेश खानविलकर,सोडमिसे,उमेश फडतरे,लोखंडे,अमीर शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.