महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
केंद्र सरकारने नुकतेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. या धर्तीवर आधुनिक भारत घडविणारे आणि व्यवसायअनुकल, लवचिक धोरणाचा अवलंब असलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणीक धोरणानुसार तयार असलेला इंदापूरचा शैक्षणीक आराखडा महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवेल , असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
शहाजीराव विकास प्रतिष्ठान वनगळी,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर आणि श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्यासंयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ समयी पाटील बोलत होते. यावेळी इंदापूर महाविद्यालयच्या शाहीर अमर शेख सभागृहात तिनींही संस्थांच्या शाखेतील दहावी व बारावीच्या गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा आणि शंभर टक्के निकाल असलेल्या शाळांचा महाराष्ट्र राज्य माजी. सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करून गुणगौरव करण्यात आला .यावेळी बावडा संस्थेचे सचिव किरण पाटील इंदापूर संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, गणपत भोंग, भिगवण महाविद्यालयचे प्राचार्य डाॅ. महादेव वाळुंज उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पुढील पन्नास वर्षाचे व्हिजन समोर ठेवून गुणात्मक शिक्षण, संशोधनात्मक शिक्षण, संस्कृती जनात्मक शिक्षण तसेच काळानुरुप बदलत्या परिस्थितीत करिअर निर्माण करणारे शैक्षणीक धोरणानुसार शैक्षणीक पद्धतीचा अवलंब करित शैक्षणीक ब्रॅन्ड तयार करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अशा शैक्षणीक धोरणानुसार तयार झालेल्या युवाशक्तीतुन राष्ट्र घडणार आहे.
समयसुचकता, सामान्य ज्ञान, डिजिटल शिक्षणाचा अवलंब करित यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. शिक्षण हे परिपूर्ण नागरिक , उत्तम संस्कार घडविणारे असले पाहिजे. शिक्षण हे निरतंर चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेतील बदल स्विकारले पाहिजेत. गुणात्मक शिक्षणाने आपला ब्रॅन्ड तयार झाला पाहिजे.
इंदापूर महाविद्यालयचे प्राचार्य डाॅ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर शैक्षणीक प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले . आभार उपप्राचार्य नागनाथ ढवळे यांनी मानले . कार्यक्रमाचे नियोजन विकास फलफले , चंद्रकांत कोकाटे , गणेश घोरपडे , केशव बनसोडे , रामहरी लोखंडे आदींनी केले .