नागठाणे :-प्रतिनिधी
२८ मे रोजी रात्री १२.१० वा . चे सुमारास मौजे काशिळ ता.जि. सातारा गावचे हद्दीत एन.एच .४ हायवे रोडवरुन बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच .४३ बी.पी .८४२७ ही जात असताना इनोव्हा कार के . एम . एच .०६ बी.एम .३७१५ मधील चालकाने अचानक आडवी मारुन गाडी थांबवुन इनोव्हा कारमधुन अनोळखी इसम उतरुन व मोटार सायकलवरून आलेले अनोळखी इसमांनी फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार गोलुसिंग दिनेशसिंग परमार यांच्या तोंडावर स्प्रे चा फवारा मारुन जबरदस्तीने खाली उतरवुन त्यांचे ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम.एच .४३ बी.पी .८४२७ घेवुन जावुन त्यामधील १७,६२,००० / – रु . एकुण ११० ग्रॅम सोन्याचे दागिने व १७ किलो चांदीचे दागिने असलेल्या कुरिअर पार्सल बॉक्स जबरदस्तीने चोरुन नेहले बाबत संतकुमारसिंग पुरणसिंग परमार वय २५ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर मुळ रा . जारगा ता . बसेडी जि.धौलपुर राज्य राजस्थान सध्या रा . २१६ , भेंडीगल्ली , शिवाजी चौक , कोल्हापुर यांनी बोरगाव पोलीस ठाणेस गु.रजि . नं .२०० / २०२३ भा.दं.वि. कलम ३ ९ ५,३४१,३३६ प्रमाणे तक्रार दाखल केली होती .
सदर गुन्ह्यातील अनोळखी ९ आरोपींचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे व डी.बी. पथक स्था.गु.शा पथक सातारा यांनी गुन्हा घडले पासुन गुन्हा उघड करण्याच्या अनुशंगाने गोपनिय बातमीदारांना सतर्क करुन गुन्हेगाराच्या मागावर होते . आरोपींची गोपनिय माहिती मिळालेनंतर त्यांना सापळा लावुन ताब्यात घेतले . आरोपींनी गुन्हा केलेचे कबुली देवुन आरोपींचे ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेला माल १ ९ , ८४,२५५ / – रु . किंमतीची १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १८.७०० किलोग्रॅम चांदीचे दागिने हा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्याचे तपासकामी जप्त करणेत आला होता . सदरचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पार पडलेनंतर फिर्यादी फिर्यादी संतकुमारसिंग पुरणसिंग परमार व साक्षीदार राजकिशोर मास्टरसिंह परमार रा . रैवियापुरा ता . बसेडी जि.धौलपुर राज्य राजस्थान सध्या रा . २१६ , भेंडीगल्ली , शिवाजी चौक , कोल्हापुर यांना परत करणेत आला आहे .
सदरची कारवाई मां . समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा , मा . बापु बांगर , अपर पोलीस अधीक्षक , सातारा , मा . किरणकुमार सुर्यवंशी , पोलीस उपअधीक्षक , सातारा शहर विभाग सातारा , मा . अरुण देवकर , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , सातारायांचे मार्गदर्शनाखाली रविंद्र तेलतुंबडे , सहा . पोलीस निरीक्षक , पो.कॉ. विशाल जाधव , मुद्देमाल कारकुन म.पो.ना. नम्रता जाधव , मोना निंबाळकर यांनी केली आहे .