महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(लोणंद) : बिलकीस शेख
कोरोना लढ्यात लढणाऱ्या योद्ध्यांची विशेष करून काळजी घेणे गरजेचे असून त्यांच्या मध्ये लढण्याचे बळ व आत्मविशास कायम निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी असताना एक सामाजिक बांधिलकी जपत इनरव्हिल क्लब लोणंद च्या वतीने आज दिनांक 10 संप्टेबर रोजी कोविड योद्ध्यांना चिक्कीचे वाटप करण्यात आले.खंडाळा येथील सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेला स्टाफ व उपचार घेत असलेले रुग्ण यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी इनरव्हिल क्लब लोणंदच्या अध्यक्षा डॉ स्वाती शहा यांनी चिक्कीचे वाटप केले.
या वेळी स्टाफ नर्स माने,जगताप,नेवसे,जाधव व वॉर्ड बॉयवाडकर उपस्थित होते.डॉ स्वाती शहा या मेडिकल ऑफिसर, डॉ.कोरडे. डॉ कोकरे.डॉ गूरव सर्व स्टाफ व इंडियन मेडिकल असोसिएशन लोणंद व खंडाळा व शिरवळ चे डॉक्टर्स या ठिकाणी हे सर्वजण सेवा देत आहेत.यावेळी सर्वाच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी या चिक्की वाटपाबद्दल माने सिस्टर यांनी इनरव्हिल क्लब लोणंद चे विशेष आभार मानले.





















