
निरा नरसिंहपुर- प्रतिनिधी सौरभ सुतार,
पिंपरी बुद्रुक येथे ग्रामीण रुग्णालया समोरील बाजूस शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाइपलाइनी फुटल्यामुळे रुग्णालयाची दुरावस्था,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर शेतकऱ्यांच्या पाईपलाइन फुटून गेलेल्या पाण्यामुळे रुग्णालयाच्या समोर चिखलमय दलदल निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजाराचे जगामध्ये साम्राज्य असताना शासकीय ग्रामीण रुग्णालया समोर पाण्याची दलदल जर होत असेल तर ग्रामीण रुग्णालय चालवायचे कसे असा प्रश्न ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निर्माण झाल्यामुळे डॉक्टर अधिकारीवर्ग त्रस्तावले आहेत . पिंपरी बुद्रुक या गावचा मध्य सेंटर असल्यामुळे अनेक गावांचा या ठिकाणी संपर्क आहे.
नरसिंहपूर, पिंपरी, टणु ,गिरवी ,ओझरे ,गोंदी, लुमेवाडी ,गणेशवाडी आडोबा वस्ती. शिंदेवस्ती. चव्हाण वस्ती. या सर्व परिसराचा समावेश असल्यामुळे शेकडो नागरिक व महिला बाळ गोपाळ वर्ग या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. तरी त्या नागरिकांना व डॉक्टर वैद्यकीय अधिकारी यांना या चिखलमय दलदलीचा त्रास सहन करावा लागत आहे तातडीने याचा बंदोबस्त होऊन ग्रामीण रुग्णालयाची सुटका व्हावी असे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्याकडून मागणी होता आहे.




















