महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती आणि रमजान ईद या निमित्ताने कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी सातारा जिल्ह्याची लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील,सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे,कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य विनायक पावसकर,फारुख पटवेकर, मजहर कागदी,विकास पवार,शांतता समितीचे सदस्य अख्तर आंबेकरी,जयंत बेडेकर नवाज सुतार जाकिर पठाण,आनंदराव लादे, विजय वाटेगावकर, दादा शिंगण, काकासाहेब जाधव व शिवसेना पदाधिकारी उपस्थिती व समितीचे सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी विविध गावचे पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले,कोणतेही धार्मिक सण किंवा महापुरुषांच्या जयंती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडत नाहीत, सर्व कार्यक्रम शांततेत पार पडतात गुण्यागोविंदाने सर्वधर्मसमभाव विचाराने लोक एकत्र येतात, हा कराडकर यांच्या विचारांचा हा विजय आहे. कराडच्या प्रत्येक नागरिकांनी हीच विचारधारा अखंडित जपावे असे आवाहनही खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
यावेळी नागरिकांना आणि सदस्यांना मार्गदर्शन करताना सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, आजच्या बैठकीतील वातावरण पाहता शिवजयंती आणि रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडेल यात काडीमात्र शंका नसून, कराडकर बांधवांनी हीच विचारधारा अखंडित जपावी असे आवाहनही अजयकुमार बन्सल यांनी केले. बैठकीचे स्वागत प्रास्ताविक कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी केले.