महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी लोणंद:-
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर युवा मंच पाडेगाव व अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मा. राजेशभाऊ खरात – अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर युवा मंच पाडेगाव, सौ स्मिता राजेश खरात -लोकनियुक्त सरपंच पाडेगाव व पाडेगाव पंचक्रोशीतील तरूण मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घघाटन मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (मा अध्यक्ष जि प सातारा) यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फलटण कोरेगाव मतदार संघाचे कार्यशील आमदार मा दिपक चव्हाण होते. या कार्यक्रमासाठी भगवानराव होळकर (उपसभापती फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती) श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक श्री भाऊसाहेब कापसे, कापडगावचे माजी सरपंच श्री प्रविण खताळ, मिरेवाडीचे विद्यमान सरपंच श्री दिपक नरूटे, बाळासाहेब ठोंबरे, माणिकराव शेळके, पाडेगावचे सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ व तरूण मंडळ उपस्थित होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पाडेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सन्मान मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दिपक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिरामध्ये 83जणांनी रक्तदान करून मानवहितार्थ कार्य केले. या शिबिराला पाडेगाव ग्रामस्थ व तरुण मंडळाचे सहकार्य लाभले. सर्वानी दिलेल्या या योगदानाबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर युवा मंचचे अध्यक्ष श्री राजेशभाऊ खरात यांनी आभार मानले.






















