महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा:-
सातारा तालुक्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या अती संवेदनशील मानले जाणारे जिहे गाव आता कोरोनामुळे चर्चेत आले आहे.कोरोनाची ही साखळी गावांमध्ये तुटता तुटत नाही.तालुका स्तरावर सातारा प्रांत अधिकारी यांनी प्रशासनाला जिहे गावामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृती समितीने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करून गाव पूर्णपणे बंद केला आहे.यामध्ये ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच उपसरपंच सदस्य आरोग्य अधिकारी अंगणवाडी सेविका आशा दीदी यांचाही प्रत्येक घरी जाऊन गावातील व्यक्तींना मार्गदर्शन व कोरोना परिस्थिती घ्यायची योग्य ती काळजी या संदर्भात जनजागृती चालू आहे.