महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी-
माणदेशी फाऊंडेशन च्या आयोजनाने जिल्हा परिषद शिक्षकांची अभ्यास परिषद व शिक्षण संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने चार कार्यशाळा होणार आहेत.या कार्यशाळेचा हेतू डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे, तसेच शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धती, विविध साक्षरता, आणि विकासात्मक मानसिकता, इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.ही परिषद ऑनलाइन असून शिक्षक परिषदेमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी या https://forms.gle/BW9gaPPj6G8Dirhc6 लिंकचा वापर करावा.
या शिक्षक परिषदेचे उद्घाटन नामदार श्री बच्चू कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री शेखर सिंह यांच्या शुभहस्ते 6 आणि 7 जुलै सकाळी दहा ते अकरा या वेळेत होणार आहे, तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी या शिक्षक परिषदेचा लाभ घ्यावा अशी माहिती माणदेशी चॅम्पियन चे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी दिली.