पिंपोडे बु – चवणेश्वर गावास मोठी निसर्गसंपदा लाभली असून ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाच्या माध्यमातून या गावाची वेगळी ओळख झाली आहे. पर्यटनस्थळ म्हणून या गावात जे जे करावे लागेल ते करुन गावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आ.दीपक चव्हाण यांनी दिली.
चवणेश्वर (ता. कोरेगाव) या ‘क’ वर्ग पर्यटनस्थळासाठी प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत 1 कोटी 33 लाखांचा निधी शासनाने मंजूर केला होता. या निधीतून एक कोटी रुपयांचा निधी घाटरस्त्यासाठी देण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आ.चव्हाण बोलत होते.
आ.चव्हाण म्हणाले, पर्यटनस्थळाचा ‘क’ वर्ग दर्जा मिळूनही वन विभागाच्या अडचणीमुळे रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. आता तीन किलोमीटर लांबीच्या घाटरस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी या कामास मंजूर झाला आहे. गेल्या साठ वर्षांपूर्वीपासूनचे रस्त्याचे स्वप्न आता सत्यात उतरत असल्याने ग्रामस्थांसह भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ना.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, चवणेश्वर गाव छोट असले तरी या गावाने राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच उच्चांकी मतदान दिले आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. येथील ग्रामस्थांचे आर्थिक जीवनमान उंचावले पाहिजे, उद्योग, व्यवसाय उभारुन ते भक्कमपणे उभे राहावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. येथील कोळी समाजाचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबर त्यांना महादेव कोळी जातीचे दाखले लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी पाठपुरावा करणार आहे. या गावातील लोक एकदिलाने चांगला विकास करत असल्याचे संजीवराजे म्हणाले.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी संचालक लालासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, संतोष पवार, जितेंद्र जगताप,चवनेश्वरचे सरपंच दयानंद शेरे, माजी सरपंच सौ.नीता पवार, सुरेश सूर्यवंशी, संभाजीराव धुमाळ पिलाजी धुमाळ, संदीप धुमाळ, बाबुराव पवार, सदाशिव जगताप, नंदकुमार देशमुख, हरिदास शेरे, युवराज शेरे, करंजखोपचे सरपंच लालासो नेवसे, धनंजय धुमाळ, भानुदास जगताप, आदिनाथ सावंत, बांधकाम विभागाचे उपअभियंता कुंभार, शाखा अभियंता वाघमारे, सावंत गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य माधुरी शेरे, नंदा शेरे, गावकामगार तलाठी राहुल नाळे, ग्रामसेवक भाऊसाहेब लोणकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग पवार, संजय सुर्यवंशी, बंडा शेरे, बाळू शेंडे, दत्तात्रय सुर्यवंशी, तात्याबा सपकाळ, अंकुश सुर्यवंशी, दगडू शेरे, अमोल शेरे, भिमराव शेरे परिश्रम घेतले. प्रास्ताविक संतोष पवार यांनी केले. युवराज शेरे यांनी आभार मानले.
दुसर्याच दिवशी प्रत्यक्ष कामास सुरुवात
चवणेश्वर रस्त्याचे काम नवनाथ वलेकर यांना मिळाले असून या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करण्याची सुचना आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली. येथील ग्रामस्थ व देवस्थानच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची या रस्त्याच्या माध्यमातून सोय होणार असून जलद गतीने काम करा, अशा सुचना त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर दुसर्याच दिवशी या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.