निरा नरसिंहपुर प्रतिनिधी सौरभ सुतार,
महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा पुणे यांच्या वतीने परिचर वर्ग-4 संवर्गा मधून कनिष्ठ सहाय्यक (लेखा) वर्ग-3 पदावर पदोन्नती कामी शासकीय पातळीवर प्रयत्न करावेत या बाबतचे निवेदन देण्यात आले.
संघटनेने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील अद्याप मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाकडील आदेश व शासनाचे वेळोवेळी घेतलेले या संदर्भातले निर्णयानुसार अद्यापही मागणी पूर्ण झाली नाही. तरी सदरचे प्रारूप प्रमाणे 7 विषयी प्रयत्न करून प्रश्न सोडविण्यासाठी विनंती करण्यात येत आहे, अशा प्रकारचे निवेदन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे संघटनेने सादर केले.
यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव संदीप चौधरी, उपाध्यक्ष मयुर ऐक्के, इंदापूर तालुका अध्यक्ष प्रवीण झगडे, सचिव दीपक भोसले, सहसचिव सचिन पोतदार, मार्गदर्शक प्रल्हाद माने तसेच महिला अध्यक्षा संजीवनी लावंड, कल्पना जगताप उपस्थित होत्या.