सातारा तालुक्यातील जिहे या गावांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तासगाव मंडल मधील सर्व ग्रामपंचायतीच्या कृती समितीचे सर्व सदस्य यांची कोव्हीड 19 (कोरोना) बाबतची तातडीची महत्वपूर्ण बैठक विजयनगर येथील जिव्हाळा हॉल येथे सातारा तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी बोलताना तहसीलदार आशा होळकर म्हणाल्या की, ग्राम कृतिसमितीने इथून पुढे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे इथून पुढे कोणतीही गोष्टीकडे ग्राम कृतिसमितीने दुर्लक्ष करू नये अन्यथा ग्राम कृती समिती मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या गोष्टीसाठी जबाबदार धरले जाईल.
तसेच गाव पातळीवर गावातील हेवे-दावे सोडून प्रत्येकाने एकत्र येऊन कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी सर्वांनी एकीने प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच अति प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींनी कोणत्याही सबब सांगून घराबाहेर पडू नये, मास्क न लावणे उघड्यावर थुंकणे समूहाने एकत्र येणे किंवा ग्राम कृती समिती च्या कामात अडथळा निर्माण करणे असे आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा नोंद केला जाईल. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे अशा पद्धतीने स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री अठले, गटविकास अधिकारी श्री ढमाळ, आरोग्य अधिकारी श्री पवार, मंडल अधिकारी श्री झनकर, यांनीही उपस्थितांना कोरोना संदर्भात सूचना सांगितल्या.या बैठकीसाठी तासगाव मंडल अंतर्गत येणारे सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्राम कृती समितीतील सर्व सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी आरोग्य सेवक बीट अंमलदार उपस्थित होते