महाराष्ट्र न्यूज (इंदापूर )प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
शुक्रवार , दि. २५ सप्टेंबर रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मानकरवाडी ( ता. इंदापूर ) येथे पं. उपाध्याय यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी भाजपाचे पुणे जिल्हा सचिव तानाजीबापू थोरात , इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह अविनाश घोलप , सतीश चव्हाण , विलास कणसे, अनिल तुपे , मोरे , अनिल काळभोर व ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली