गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील सरपंच जितेंद्र यशवंत यांनी शासनाकडून त्यांना सरपंच म्हणून मिळालेले सर्व मानधन कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांना देऊन स्वतःच्या जीवावर उदार होऊन केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या वेळी सरपंच जितेंद्र यशवंत यांनी रक्षाबंधनाची ओवाळणी गावाला कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या भगिनींना दिल्याची भावना व्यक्त केली. यावेळी उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामसेवक आर एन गाढवे, माजी सरपंच आप्पासो धनवडे, पांडुरंग कांबळे, आरोग्यसेविका संध्या महाजन, कृष्णात रेवडे ,अमित माळी, गुंडा वायदंडे , आशा सेविका , अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.