बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील युवकाला कोरोना पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
ही व्यक्ती ४५ वर्षीय असून ती भोर या ठिकाणी कामाला आहे. भोर मध्ये तो कोरोना पेशेट च्या संपर्कात आल्यावर त्याची कालच भोर या ठिकाणी कोरोना तपासणी करण्यात आली होती. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती भोर आरोग्य विभागाने बारामती आरोग्य विभागाला दिली.असल्याने खंडोबाचीवाडीसह नजीकच्याच निरा-निंंबुत आणि सोमेश्वरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






















