गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कराड
देशात कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात सलग २ वर्षे प्रथम स्थान मिळवले असताना यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी न होण्याच्या मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरसेवकांना दिलेली पत्रे हि चुकीची असुन नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांनी अजुन मासिक सभेच्या ठरावावर सह्या केल्या नाहीत. जर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आमचे जनशक्ती आघाडीचे सर्व नगरसेवक कुठे कमी पडले असतील तर आम्ही सर्वजण राजीनामा देऊ असा इशारा जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी नगरसेवक विजय वाटेगांवकर, नगरसेवक हणमंत पवार,नगरसेवक स्मिता हुलवान, नगरसेवक किरण पाटील,नगरसेवक गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, प्रितम तादव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राजेंद्रसिंह यादव म्हणाले, जनशक्ती आघाडीने नेहमीच विरोधकांना विकासकामांत गेली ४ वर्षात सहकार्य केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आम्ही पुन्हा एकदा कराडला देशात अव्वल आणणार असुन आमच्याकडे बहुमत असताना देखील नगराध्यक्ष मनमानी कारभार करीत आहेत.असा आरोप यावेळी यादव यांनी केला.
यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांच्यावर जोरदार टिका करीत नगराध्यक्षा सत्तेचा चुकीचा वापर करीत असुन गावाला वेठीस धरीत आहेत. यापुढील काळात स्वच्छ सर्वेक्षणाचे काम मोठया प्रमाणात सुरु राहिल असा विश्वास दिला.