बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मु सा काकडेमहाविद्यालयात हे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील १० दिवस बंद असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण संख्या लक्षात घेता हे महाविद्यालयात पुढील दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतलाआहे. मुलांसाठी महाविद्यालयाला सुट्टी असली तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा १२० लोकांना महाविद्यालयात येणे अनिवार्य होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे महाविद्यालयाच्या कार्यालयात ऍडमिशन अथवा चौकशीसाठी येत असल्याने गर्दी होत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाआहे. मात्र महाविद्यालयाच्या अत्यावश्यक कामासाठी आठ ते दहा लोकांच्यात कार्यालय सुरूच राहील अशी माहिती डॉ.केंजळे यांनी दिली.