महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी :
शहाजीराजे भोसले :
इंदापूर येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी शहरातील आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी माजी.उपनगराध्यक्ष व विचार मंथन परिवाराचे अरविंद वाघ , शिवाजीराव मखरे , पुणे जिल्ह्याचे आर पी आय संघटक बाळासाहेब सरवदे , कार्याध्यक्ष संदिपान कडवळे , वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे , मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष ललेंद्र शिंदे , माऊली नाचण , हमीदभाई आतार , नितीन आरडे , विशाल चव्हाण , अमोल पोळ आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते . हा कार्यक्रम शासकीय नियम पाळून करण्यात आला . यावेळी सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करण्यात आला.






















