ग्रामपंचायत व पोलीसांकडून विना मास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/कळंब – इंदापूर तालुक्यातील कळंब येथे दि . १७ जुलै रोजी नवीन कोरोनाचा रूग्ण आढळून आलेने प्रशासनाने कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
गावाच्या परिसरातील आजपासून पुढील आदेशापर्यंत सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आली आहेत.
नवीन आढळून आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील ९ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत .
ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पोलीसांकडून विना मास्क फिरणारे लोकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे .
कळंब परिसरात कोरोनाचा पहीला रूग्ण बरा होवून घरी गेल्यानंतर , आता नवीन रूग्ण आढळलेमुळे नागरिकांत भीती व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .