सलाम त्या वर्दीतल्या माणुसकीला…..
महाराष्ट्र न्यूज राहुल ताटे पाटील-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व मराठ्यांची राजधानी राजधानी असणाऱ्या सातारा मध्ये वेगवेगळ्या अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशासन स्तरावर काम करत असताना सातारकराच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.सातारा क्रांतिकारकांचा तसेच राज्याबरोबर देशाचेही नेतृत्व करणारी कर्तबगार माणसेही यात सातारा भूमीतीलच ! कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये प्रशासन स्तरावर सर्व शासकीय विभाग आपापल्या परीने परिस्थितीला दोन हात करत आहेत.
या संकटकालीन परिस्थितीमध्ये पोलिस प्रशासन मात्र सर्वात पुढे असतो जिथे कमी तिथे आम्ही अशीच परिस्थिती नेहमीच दिसते, असाच अनुभव आज दुपारी पोवई नाका या ठिकाणी भर रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे राजपथ मार्गाकडे जाणारी वाहने त्यामध्ये आदळत होती. ही गोष्ट पोवई नाका चेक पोस्ट बंदोबस्त चालू असताना सदरचा रस्त्यामधील खड्डा पोलीस सपोनि विठ्ठल शेलार यांच्या निदर्शनास आला त्यावेळी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले त्यांनी स्वतः व त्यांच्या बरोबर असणारे व त्यांचे सहकारी कर्मचारी महिला पोलीस अश्विनी सूर्यवंशी, पोलीस नाईक आनंद भोसले, यांनी स्वतः हातात फावडे घेऊन भर रस्त्यात या कोरोना परिस्थितीमध्ये आपले काम सांभाळून पडलेला खड्डा मुजवला.
इतर वेळेला पोलीस प्रशासनावर वेगवेगळे आरोप होत असतात. पण या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आपले काम इमानेइतबारे करत सामाजिक जबाबदारी पार पडताना दिसतात.
खाकीची तीच खरी ओळख…
जिथे कमी तिथे आम्ही.
सातारा खाकी.