महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब-इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील बावडा – लाखेवाडी गटातील जेष्ठ व गरजं नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमी वर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन डी या गोळ्यांचे वाटप जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने बावडा येथे हा उपक्रम राबविण्यात आला . बावडा – लाखेवाडी गटातील संपूर्ण जेष्ठ व गरजू नागरिकांना या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यारे गोळ्यांचे वाटप करण्यात आले .
यावेळी बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ . कपिल वाघमारे , सरपंच किरण पाटील , उपसरपंच निलेश घोगरे , आरोग्य कर्मचारी , ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते .
या उपक्रमाचा बहुतांशी नागरिकांनी लाभ घेतला .