महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय पुणे येथे चतुर्थ वर्षा मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागृकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आपल्या गावातीलशेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमा मधे शास्त्रीय पद्धतीने मातीचे नमुने कसे घ्यावे, फळबाग लागवड, बीजप्रक्रिया, शेतमाल व दुग्ध प्रक्रिया, जनावरांचे लसीकरण, एकात्मिक किड व रोग नियंत्रण तसेच शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्यास मार्केटिंग ऍप विषयीची माहिती कृषिदूत योगेश म. सरक यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांना सांगितले . याबाबत मिरगांव ग्रामपंचायत सरपंच यानी कृषिदूत योगेश म. सरक यांचे आभार मानले, व इथुन पुढे महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमास सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.