फलटण : मुरूम, ता. फलटण येथे ध्वनिचित्रफीत तयार केल्याच्या कारणावरून दहा जणांनी मिळून एकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दि. 19 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुरूम, लक्ष्मी नगर मधील अमोल काशीद यांच्या घरासमोर असलेल्या रस्त्यावर सुरज वसंत बोडरे, प्रणित बोडरे, उमेश खोमणे, शिवाजी खोमणे, नवनाथ खोमणे, किरण खोमणे ,राहुल भंडलकर, अंकुश भंडलकर, चंद्रकांत खोमणे, संभाजी खोमणे सर्वजण रा. मुरूम, ता. फलटण येथील असून त्यांनी सुभाष पोपटराव बोंद्रे रा. मुरूम यांना प्रणित बोडरे यांच्याकडे एका पोत्यातून तलवारी जमिनीवर खाली टाकत असताना चे व्हिडिओ शूटिंग मोबाईल मध्ये केले असल्याचा राग मनात धरून वरील दहा जणांनी तलवार व सत्तूर सारख्या हतार्यांनी डोक्यात वार करून व लाथाबुक्क्यांनी जीवघेणी मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डी.पी. दराडे हे करत आहेत