महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार :
साखरवाडी ता फलटण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी अनिकेत उघडे पाटील व आरोग्य सेविका शिर्के यांच्या हलगर्जीपणा गावातीलच गरोदर महिला प्राची सागर जावळे या महिलेच्या जीवावर बेतला असून दि.२९ रोजी पहाटे ५.३० वाजता सदर महिलेची प्रसूती झाली असून महिलेला आधी दाखल करून घेण्यास नकार येथील कर्मचऱ्यानी दिला,कुटुंबीय महिलेला घेऊन घरी गेले पहाटे महिलेला घरी त्रास व्हायला लागल्याने पुन्हा तिला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता सुमारे एक तास दरवाजा ठोठावून सुद्धा कोणीही दरवाजा उघडला नाही नंतर दरवाजा उघडल्यावर शिर्के नामक आरोग्य सेवकेने तुम्हाला सांगितलं ना, ‘तुमच्या पेशंटची इथे प्रसूती होणार नाही तुम्ही तरी इथे कशाला आला?असे म्हणून पेशंटला दाखल करून घेणे टाळाटाळ केली.मात्र महिलेला जास्त त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी इथेच प्रसूती करा म्हणून विनवणी केली. प्रसूतीनंतर महिलेला सुमारे २०/२५टाके टाकले असल्याचे नातलग सांगत आहेत. संध्याकाळी ९ वाजता वैद्यकीय अधिकारी यांनी कुटुंबियांना बोलावून, ‘तुमच्या पेशंट सिरीयस असून पुढील उपचारासाठी तुम्ही फलटणला जा इथे उपचार होणार नाहीत’ असे म्हणून पेशंटला बळजबरीने बाहेर काढले.प्रसूती साठी वैदयकीय अधिकारी अनिकेत उघडे पाटील यांनी पैसे मागितल्याचा सुद्धा आरोप सुद्धा संबंधित महिलांच्या कुटुंबांनी केला असून संबंधित महिला आता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून महिलेला उपचारासाठी ७० ते ८० हजार खर्च सांगितला असून सदर खर्च कोणी करायचा. हा प्रश्न गरीब कुटुंबापुढे पडला असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संबंधित कुटुंबीय करत आहे.