महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: (लोणंद)
लोणंद पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार दि .२४ / ०७ / २०२० रोजी डोंबाळवाडी ता.फलटण गावचे हददीतील डोंबाळवाडी गावात जाणारे रोडचे डावे बाजुस मनोज नरसिंह पवार रा.सोमवारपेठ फलटण यांचे शेतात विट भटटी जवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये नमुद ठिकाणी यातील आरोपी हे स्वताचे आर्थिक फायदयाकरीता बेकायदा , विगरपरवाना तीन पानी पत्याचा जुगार खेळत असताना मा.जिल्हाधिकारी सो सातारा यांनी पारित केलेला कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीआरपीसी १४४ प्रमाणे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन तोंडास मास्क न लावता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी न घेता हयगयीने एकत्र बसुन मानवी जिवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याच संभव असल्याने घातक कृती करुन शासनाचे आदेशाचे उल्लंघन केलेले मिळुन आले
आरोपी मनोज मोहन कोकरे वय २ ९ वर्षे रा.पणदरे ता.बारामती , गणेश विठठल कांबळे वय ३६ वर्षे रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती , उमेश रमेश खरात वय ४०. वर्षे रा.लोणंद ता.खंडाळा ,रामचंद्र बबन कर्नवर वय ५४ वष रा.गूळंचे ता.पुरंदर , बाळासो किसन मदने वय ३५ वर्षे रा.निरा वागज ता.बारामती ,जगन्नाथ सखाराम मदने वय ५० वर्षे रा.मिरेवाडी ता.फलटण ,रुपेश राहुल कांबळे वय ३२ वर्षे रा.निंभारे ता.फलटण, महेश भालचंद्र भागवत वय ३४ वर्षे रा.बाळासाहेबनगर लोणंद ता.खंडाळा, सुनिल धुमसेन सोनवणे वय ५८ वर्षे रा.पिंपरे खु ता.पुरंदर, दत्तात्रय पोपट गायकवाड वय २८ वर्षे रा.पणदरे ता.बारामती ,सुरेश आनंता भुजबळ वय ६६ वर्षे रा.वाल्हे ता.पुरंदर , सागर सुरेश खंडाळे वय ३३ वर्षे रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती ,मनोज नरसिंग पवार वय ३३ वर्षे रा.सोमवार पेठ ता.फलटण या आरोपींच्याकडील रोख रक्कम रु ३०,१२०,मोबाईल फोन , दुचाकी व चारचाकी वाहने एकूण असा एकूण २४,२२,०००रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
वरील इसमांवर अविनाश सुरेश शिंदे पो.कॉ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहेया कारवाई कारवाईमध्ये संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ देवेंद्र पाडवी,पो.ना. ज्ञानेश्वर मुळीक, पो.ना.मल्हारी भिसे,पो. को. फयाज शेख,पो.को. श्रीनाथ कदम,पो.को. अविनाश शिंदे,पो.को. केतन लालगे,होमगार्ड संतोष इंगवले, ओमकार कोळी, भिकू येळे, जयदीप भोईटे यांनी सहभाग घेतला होता अधिक तपास सहा.पो.फौजदार डी.आर.पाडवी हे करत आहेत