महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
लोकसभेत बारामती मतदार संघाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे , पुणे जिल्ह्यातील एकूण चार लोकसभा मतदार संघ आहेत , त्यामध्ये पुणे , शिरूर , मावळ , व बारामती हे मतदार संघ आहेत , बारामती हा ग्रामीण भागातील मतदार संघ आहे , शेतकरी व मजूर या संघातील मतदार आहेत
बारामती लोकसभा मतदार संघात पुनर्रचनेआधी हवेली , शिरूर , दौंड , इंदापूर , बारामती हे सहा विधानसभा मतदार संघ होते ,नव्याने झालेल्या पुनर्रचनेत बारामती ३५ लोकसभा मतदार संघात दौंड , इंदापूर , पुरंदर , भोर , खडकवासला , बारामती असा नव्याने मतदार संघ अस्तित्वात आहे .१९५७ ते २०१९ पर्यंतच्या निवडणूकीचा इतिहास पाहिल्यास सर्व मातब्बर उमेदवार व विविध पक्ष दिसून येतात .१९५७ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे केशवराव जेधे , १९६२ साली काँग्रेस पक्षाचे गुलाबराव जेधे ,१९६७ साली काँग्रेस पक्षाचे तुळशीदास जाधव , १९७१ साली र.के.खाडिलकर , या मातब्बर नेत्यांनी १९५७ ते १९७७ पर्यंत कॉंग्रेस पक्ष्यांची राजकीय पक्कड या मतदार संघावर ठेवली होती .
परंतु १९७७ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते विठ्ठलराव गाडगीळ व जनता (भालोद) चे संभाजीराव काकडे यांच्यात जोरदार लढत झाली , या लढतीत पहिल्यादा च काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रभाव झाला , आणि पहिल्यांदाच जनता (भालोद) पक्षाचा उमेदवार निवडून आला, याचा खूपच मोठा “राजकीय धक्का” दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाला बसला ,
सन १९७७ साली झालेला पराभव काँग्रेस पक्षाच्या जिव्हारी लागला होता , कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला हवा होता , यासाठी दिल्लीतून या मतदारसंघात मातबबर व शेतकऱ्यांशी नाळ असणाऱ्या नेत्याला उमेदवारी दिली जावी असा फतवा आला , आणि अशातच इंदापूरचे शंकरराव बाजीराव पाटील यांना काँग्रेस पक्षाने १९८० च्या निवडणूकीत उमेदवारी दिली , ही निवडणूक अतिशय लक्ष्यवेधी झाली , कारण ही तसच होत , काँग्रेस चे उमेदवार शंकरराव पाटील यांच्या विरोधात जनता पक्षाचे संभाजीराव काकडे,काँग्रेस (अर्स) चे मोहन धारिया , बसपचे एम.एन.जाधव व इतर पाच अपक्षामध्ये ही लढत झाली , या लढतीत अखेर शंकरराव पाटील विजयी झाले , व त्यांनी हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे खेचून घेतला ,
१९८० साली काँग्रेस पक्षाकडे आलेला हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यातून गेला , बारामतीचे शरद पवार हे काँग्रेस (समाजवादी) पक्षातून उभे राहिले , व त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे शंकरराव पाटील यांच्यात लढत झाली , या लढतीत शरद पवार विजयी झाले , पवारांची संसदीय राजकारणातील ही पहिली एन्ट्री होती .१९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता दलाचे संभाजीराव काकडे याना पराभूत करून काँग्रेसचे शंकरराव बाजीराव पाटील हे विजयी झाले , पुन्हा हा मतदारसंघ या निवडणुकीत परत काँग्रेस पक्षाकडे आला .१९९१ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना उमेदवारी दिली , काँग्रेसचे अनंतराव थोपटे , शंकरराव पाटील , सुभाष कुल , यांनी त्यांना निवडून आणले .१९९१ मध्ये अजित पवारांनी राजीनामा दिला , व त्याजागेवर पुन्हा शरद पवार खासदार झाले ,१९९४ साली काँग्रेस पक्षाचे बापूसाहेब थिटे तर १९९६ साली काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे खासदार झाले .१९९८ साली काँग्रेस पक्षाचे शरद पवार विजयी झाले , त्यांनी भाजपचे विराज काकडे यांचा पराभव केला होता
१९९९ मध्ये झालेली निवडणूकित शरद पवारच विजयी झाले ,२००४ सालची लोकसभेची निवडणूक लक्षवेधी झाली , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष व राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यात लढत झालीया लढतीत शरद पवार विजयी झाले , २००९ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या निवडुन आल्या होत्या .२०१४ सालची निवडणूक अतीशय संघर्षमय निवडणूक झाली , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने , पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे याना पुन्हा उमेदवारी दिली , तर त्यांचा विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी जोरदार लढत दिली,या लढतीत निसटता पराभव जानकर यांचा झाला ,२०१९ मध्ये भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल याना उमेदवारी दिली , त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली , सुप्रिया सुळे यांना निवडुन आणण्यासाठी इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील , भोरचे आमदार संग्राम थोपटे , यांनी जोरदार प्रयत्न केले , अखेर या मतदार संघात सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या
अशा प्रकारे या बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाल्या , मातबबर उमेदवाराच्या लढाईत राजकीय संघर्ष झाला , अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षाकडे हा मतदार संघ गेला आहे .