फलटण प्रतिनिधी :- अधिवक्ता परिषद फलटण यांचे वतीने आयोजित कार्यक्रमात तहसीलदार समीर यादव यांच्या हस्ते रामकुंड टॉवर या ठिकाणी वृक्षारोपण करून जागतीक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.
फलटण शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन निसर्गाचा समतोल राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तहसीलदार समीर यादव यांनी सर्व नागरिकांना केले आहे. रामकुंड टॉवर या ठिकाणीवृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तहसीलदार समीर यादव व पत्रकार शक्ती भोसले, वैभव गावडे, अभिजित सरगर, विक्रम चोरमले यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अधिवक्ता परिषद फलटण चे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब सरक,तसेच ज्येष्ठ ॲड.भानुदास शिर्के, निसर्ग सोबती चे ॲड. रोहिणी भडळकर ,श्री.कैलास साळुंखे तसेच रामकुंड टॉवर चे सचिव श्री.हरिदास शेंडगे,श्री.पवार, हिंदुराव सस्ते, ॲड. अक्षय सोनवलकर व अधिवक्ता पदाधिकारी तसेच निसर्ग सोबती मोठ्या संख्येने उपस्थित होते.